Wheat Rate : गव्हाचा बफर स्टाॅक घटला

Anil Jadhao 

सध्या बाजारात गव्हाचे दर वाढलेले आहेत. सरकारकडे गव्हाचा बफर स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे दिवाळीपासून गव्हाचे दर वाढलेले दिसत आहेत.

गेल्या रब्बी हंगामात उष्णतेमुळे गहू उत्पादनात घट झाली. त्यामुळे सरकारची खरेदीही घटली.

सरकारकडे १५ ऑक्टोबरपर्यंत २२२ लाख १८ हजार टन गव्हाचा साठा होता. तो ऑक्टोबरच्या प्रारंभी २२७ लाख ४६ लाख टनांवर होता.

तर १ सप्टेंबर रोजीचा साठा २४८ लाख २२ हजार टन गहू सरकारच्या गोदामांमध्ये होता. मात्र अन्न सुरक्षेच्या नियमानुसार १ ऑक्टोबरपर्यंत २०५ लाख २० हजार टन बफर स्टाॅक असणं गरजेचं आहे.

१ ऑक्टोबर २०२१ रोजी सरकारकडील बफर स्टाॅक ४६८ लाख ५२ हजार टनांवर होता. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचा साठा २४६ लाख ३४ हजार टनाने कमी आहे.

सरकारकडे गव्हाचा साठा कमी असल्याने सध्या दर वाढलेले असूनही सरकारला खुल्या बाजारात गव्हाची विक्री करता येत नाही. रब्बीचा गहू एप्रिल महिन्यापासून बाजारात येऊ शकतो. तोपर्यंत गव्हाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गव्हाचे दर वाढलेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image