Grapenet Registration : ग्रेपनेट प्रणालीत नोंदणी सुरू

Team Agrowon

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ही नोंदणीची स्थिती काही प्रमाणात संथ असल्याची स्थिती आहे.

Grapenet Registration | Agrowon

२२ डिसेंबरअखेर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३१,८२१ प्लॉटची नोंदणी पूर्ण झाली आहे.

Grapenet Registration | Agrowon

यंदा पावसामुळे हंगाम प्रभावित झाल्याने नोंदणी लांबणीवर गेल्याची स्थिती आहे. यामुळे जानेवारी महिन्यापर्यंत याचा टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Grapenet Registration | Agrowon

गोडी बहार छाटण्या झाल्यानंतर ग्रेपनेट प्रणालीत निर्यातक्षम बागांची नोंदणी सुरू होते. हे कामकाज यंदा संथपणे सुरू आहे.

Grapenet Registration | Agrowon

संततधार पाऊस व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात गोडीबहर छाटणीची कामे अडचणीत आली. त्यामुळे हंगाम प्रभावित होऊन जवळपास चार आठवडे पुढे गेल्याची स्थिती आहे.

Grapenet Registration | Agrowon

चालूवर्षी आव्हानात्मक परिस्थितीत द्राक्ष उत्पादक हंगामाला सामोरे गेले आहेत. त्यामुळे छाटणी झाल्यानंतर ग्रेपनेट प्रणालीत नोंदणी लांबणीवर गेल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

Grapenet Registration | Agrowon
cta image | Agrowon