Green Chili Rate: हिरवी मिरची तेजीत

Anil Jadhao 

बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय. हिरव्या मिरचीच्या दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून टिकून आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील तीन महिन्यांमध्ये काही दिवस सतत पाऊस झाले. त्यामुळं मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील मिरची आवक काहीशी अधिक दिसत असली तरी इतर बाजार समित्यांमधील मिरची आवक मात्र कमीच आहे.

पिकांचे नुकसान झाल्याने बाजारातील हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत राहीली. दुसरीकडं मागणी मात्र कायम आहे.

बाजारातील कमी पुरवठा आणि मागणी वाढल्याने हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळत आहे.

हिरव्या मिरचीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

cta image