Green Chilli : हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत

Anil Jadhao 

राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक मर्यादीत स्वरुपात होत आहे.

मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीच्या दरात काहीशी घट दिसून आली होती.

सध्या महत्वाच्या बाजार समित्या वगळता मिरचीची आवक सरासरी ३० क्विंटलपेक्षा कमी होत आहे.

हिरव्या मिरचीला २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

पुढील काळात हिरव्या मिरचीची आवक आणखी मर्यादीत होण्याची शक्यता आहे.

बाजारातील आवक कमी राहून दरात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.