Sugar Export : साखर निर्यातीला हिरवा कंदील ?

Team Agrowon

केंद्राने ६० लाख टन साखर निर्यातीची (Sugar Export) दिलेली परवानगी ही अंतिम परवानगी नसून साखरेची मे नंतरची परिस्थिती पाहून निर्यातीला पुन्हा परवानगी मिळू शकते, असा निर्वाळा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने निर्यातीचे धोरण (Sugar export Policy) जाहीर केल्यानंतर दिला आहे.

Sugar Export | Agrowon

केंद्राने यंदाचे साखर निर्यात धोरण जाहीर करण्यास हंगाम सुरू झाल्यानंतर जवळजवळ महिनाभर उशीर केला. त्यातच खुल्या पद्धतीने निर्यातीस परवानगी दिली नाही.

Sugar Export | Agrowon

असे असतानाही मे पर्यंत ६० लाख टन इतक्या मर्यादित स्वरूपात साखर निर्यातीस परवानगी दिली.

Sugar Export | Agrowon

साखर साठा संभाव्य विक्री आणि दर याबाबतचा तपशील मागवल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Sugar Export | Agrowon

गेल्या वर्षी ११२ लाख साखर निर्यात झाली होती. जून-जुलैमध्ये पावसाळी हवामानामुळे साखर निर्यातीस अडथळे येत असल्याने या दोन महिन्यात साखर निर्यात कमीच होते.

Sugar Export | Agrowon

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर निर्यातीस कमी परवानगी मिळणार, हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने मे नंतर निर्यातीस परवानगी मिळू शकते, असे सांगितले आहे.

Sugar Export | Agrowon
cta image | Agrowon