' गुलमोहर डे ' आजच का साजरा होतो?

Anil Jadhao 

साताऱ्यात एक मे हा दिवस ' गुलमोहर डे ' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणारे सातारा हे बहुधा जगातले पहिलेच शहर असावे. १९९९ सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे.मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो.

Agrowon

मे महिन्यात गुलमोहोराच्या झाडाला बहर येतो. लाल-केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो. त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा असे वाटून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून 'गुलमोहर डे' साजरा करण्याची पद्धत साताऱ्यात सुरू झाली.

Agrowon

सागर गायकवाड आणि पी. व्ही. तारू या दोघांनी सर्वांत आधी ही कल्पना मांडली. दरवर्षी १ मेला कलासक्त मंडळी एकत्र येतात आणि आपापल्या परीने गुलमोहराचे वर्णन करतात.

Agrowon

चित्रकार गुलमोहराची चित्रे काढतात, कवी गुलमोहरावर कविता करतात, फोटोग्राफर कॅमेऱ्यांत बंदिस्त केलेल्या गुलमोहराच्या फोटोंचे प्रदर्शन भरवितात. ऐश्वर्या भोसले यांनी टिपलेला मनमोहक गुलमोहर.साताऱ्याच्या पोवई नाक्याजवळ ६७ गुलमोहराची झाडे असणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम साजरा केला जातो. हा उपक्रम तेथे दरवर्षी होत असल्यामुळे या रस्त्याला 'गुलमोहर रस्ता' असे नाव देण्यात आले आहे.

Agrowon

साताऱ्याच्या पोवई नाक्याजवळ ६७ गुलमोहराची झाडे असणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम साजरा केला जातो. हा उपक्रम तेथे दरवर्षी होत असल्यामुळे या रस्त्याला 'गुलमोहर रस्ता' असे नाव देण्यात आले आहे.

Agrowon

हा उपक्रम आता एक सांस्कृतिक चळवळ बनून गेला आहे. वृक्षारोपण, प्रत्यक्ष निसर्गचित्रण, चित्रप्रदर्शन, कविता वाचन, कथ्थक नृत्य, शास्त्रीय गायन असे विविध कार्यक्रम या दिवशी केले जातात. गुलमोहोराची रोपे देऊन त्यांची काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon