Mango Season : वाढत्या उन्हाच्या झळा 'हापूस'ला सोसेना

Team Agrowon

सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मोहरानंतर फळधारणा झालेल्या हापूस आंब्याला वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे.

Mango Blossom | Agrowon

अशातच तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहरापासून आंबा उत्पादन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Mango Blossom | Agrowon

तिसऱ्या टप्प्यातील मोहोराच्या आंब्याचे उत्पादन मे अखेर किंवा जूनच्या सुरूवातील येण्याचा अंदाज आहे.

Mango Blossom | Agrowon

मात्र या आंब्याचे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Mango Blossom | Agrowon

या वर्षी पहिल्या टप्प्यात १५ ते २० टक्के, दुसऱ्या टप्प्यात २५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यात ५० ते ६० टक्के मोहर आला.

Mango Blossom | Agrowon

पहिल्या टप्प्यातील मोहर नोव्हेंबर, डिसेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मोहर जानेवारी, तर तिसऱ्या टप्प्यात मोहर फेब्रुवारी महिन्यात आला.

Mango Production | Agrowon

पहिल्या टप्प्यातील आंब्याच्या काढणीला काही भागात सुरुवात झाली असून दुसऱ्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत येईल.

Hapus Mango | Agrowon
Papaya | Agrowon