हरियाणात भातपिकाच्या लागवडीस पसंती

Devendra Shirurkar

तांदळाच्या दरातील संभाव्य वाढ लक्षात घेत हरियाणातील शेतकऱ्यांनी भातपिकाच्या लागवडीस पसंती दिली आहे. एकरी उत्पादन आणि आर्थिक उत्पन्नात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी भातपिकाला पसंती दिल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Paddy Cultivation | Agrowon

१५ जूनपासून राज्यातील भातपीक लागवडीस सुरुवात होईल. मात्र कर्नाल, कुरुक्षेत्र आणि पानिपत परिसरात शेतकऱ्यांनी पुसा-१५०९ या वाणाची लागवड करायला सुरुवात केली आहे.

Pusa-1509 | Agrowon

गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी बासमतीच्या पुसा-१५०९ वाणाची लागवड केली होती. त्यांना अंदाजे एकरी ६५ हजार रुपयांचे उत्पन्न पदरी पडले. यावर्षीही बासमतीचे दर चांगले राहतील, असा कयास वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाही बासमतीच्या पुसा-१५०९ या वाणाच्या लागवडीस पसंती दिली असल्याचे हरियाणाच्या कृषी विभागाने नमूद केले आहे.

Pusa-1509 | Agrowon

इतर वाणांच्या तुलनेत याला कमी पाणी लागते. पीक लवकर हातात येते त्यामुळे शेतकऱ्यांना तिथे भाजीपाला अथवा अन्य पिकांची लागवड करता येत असल्याचे कुरुक्षेत्र येथील शेतकरी राज कुमार यांचे म्हणणे आहे.

Pusa-1509 | Agrowon

यावर्षी राज्यात १२. ५० लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड केले जाईल, असा अंदाज हरियाणा कृषी विभागाचे सह संचालक जगराज दंडी यांनी व्यक्त केला. यातील निम्म्या क्षेत्रात बासमतीच्या वाणाची लागवड केली जाईल, असा अंदाज दंडी यांनी व्यक्त केला.

Paddy Cultivation | Agrowon

बासमतीच्या इतर वाणांच्या तुलनेत शेतकरी पुसा-१५०९ या वाणाला पसंती देत आहेत. हे बियाणे खाजगी विक्रेत्यांकडे सहजपणे उपलब्ध होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Cultivation | Agrowon