Dhananjay Sanap
सह्याद्रीच्या कुशीतून एक पर्वतरांग आमच्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा भागातून निघते आणि थेट जगप्रसिद्ध वेरूळकडे जाते.
या डोंगररांगांमधून काल १०-१२ तास मनसोक्त भटकलो. वाटेत समृद्धी महामार्ग लागला. त्याला ओलांडून मराठवाड्यातील वाळवंटी भागात गेलो.
आपली शहरी मुले केवळ मित्रांमध्ये , महाविद्यालयात किंवा एखाद्या समारंभाला जाताना टापटीप असतात; पण गुरख्यांची आजची मुले रानातदेखील हँडसम राहू लागली आहेत.
मराठवाड्याच्या कुशीतील शेतकऱ्यांची नवी पिढी. वेरूळ डोंगररांगांमध्ये पाण्याची टंचाई असते. पण हा आहे जिगरबाज शेतकरीपुत्र मोहन. त्याने शेतात विहीर बांधली. गव्हाचा मळा फुलवला. गव्हाला बारे देतो आणि वेळ मिळताच स्पर्धा परीक्षेची तयारी करतो.
फुले कोणतीही असू देत. ती जलाशयाचे सौंदर्य वाढवतात.
काल सकाळी भटकंतीत तलावाकाठी भेटलेली फुले..!
रानातले स्त्री विश्व..!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.