पावसाळ्यात असे टाळा खुरांचे आजार !

Roshani Gole

पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्याने, जनावरांना इतर संसर्गजन्य आजारांबरोबर खुरांचे आजारही होत असतात.

Agrowon

गोठ्यातील अस्वच्छता, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या गोष्टी खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात. पावसाळ्यात खुरे सतत ओली राहिल्याने ती मऊ पडतात.

Agrowon

गोठ्यामध्ये जनावरे बसण्या-उठण्याच्या जागी कोरड्या चाऱ्याचे किंवा भूश्श्याचे जाड बेडिंग मटेरिअल तयार करावे. असे केल्याने जनावरांच्या खुरांचा मल-मुत्राशी डायरेक्ट संबंध येणार नाही.

Agrowon

खुरांच्या आरोग्याची काळजी घेताना खुरांची अतिरिक्त वाढ न होऊ देणं, देखील महत्त्वाचं आहे. यासाठी अतिरिक्त वाढ झालेली खुरे वेळोवेळी कापली पाहिजेत.

Agrowon

पावसाळ्यात खुरांचे आजार टाळण्यासाठी फुट बथिंग करणे गरजेचं आहे. फुट बथिंगसाठी पाण्यात जंतुनाशक औषध टाकावे. जंतुनाशकांची फवारणी गोठ्यात वेळोवेळी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon