Soluble Fertilizers Use : फवारणीद्वारे विद्राव्य खते कशी उपयुक्त आहेत?

Team Agrowon

सूक्ष्म सिंचन पद्धत

अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक आणि अन्य सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करू लागली आहेत.सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा  वापर केला जातो. 

Soluble Fertilizers Use | Agrowon

विद्राव्य खते

पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही  करता येतो.

Soluble Fertilizers Use

फवारणीद्वारे विद्राव्य खताचा वापर

विद्राव्य खताचा वापर केल्यास खताची नासाडी होत नाही. पीक फुलो­ऱ्यात येण्याचा काळ, फळधारणा झाल्यानंतर तसेच बिया, फळांची वाढ होण्याकरिता जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशा वेळेस फवारणीद्वारे दिलेली खते खूप उपयोगी पडतात.

Soluble Fertilizers Use | Agrowon

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार वापर

ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यायची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहे‏त. 

Soluble Fertilizers Use | Agrowon

फवारणीतून विद्राव्य खताचा वापर

फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. मात्र  फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात. 

Soluble Fertilizers Use | Agrowon

द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण

पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे.

Soluble Fertilizers Use | Agrowon
Indrajit Bhalerao Book | Agrowon