Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल?

Team Agrowon

कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.

Cotton Bollworm Attack | Agrowon

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीडनाशकाची फवारणी करावी.

Cotton Bollworm Information | Agrowon

ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय झालेले आहेत.

Cotton Bollworm Control | Agrowon

मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल.

Cotton Outbreak | Agrowon

ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २ ते ३ या प्रमाणात पीक ६० दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.

Cotton Bollworm Control | Agrowon

५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीयुक्त कीडनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Cotton Bollworm Chemical Control | Agrowon

किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी हेक्टरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावावेत.

Cotton Pink Bollworm | Agrowon