Animal Care : जनावरांना खारे पाणी दिल्यामुळे काय होतं?

Team Agrowon

खारे पाणी पिणारी जनावरे नियमित चारा खात असली तरी सतत खारे पाणी पिण्यामुळे जनावरांच्या पोटात उपयुक्‍त असणारे जीवाणू व प्रोटोझुआच प्रमाण कमी होऊन अन्न पचन करण्याची प्रक्रिया बिघडते.

Animal Care | Agrowon

अन्नाच उत्सर्जन योग्य प्रकारे होत नाही.

Animal Care | Agrowon

जनावरांची पचन शक्‍ती कमी झाल्यामुळे पोषक द्रव्यांचे योग्यरित्या पचन व शोषण होत नाही. त्यामुळे दुग्धउत्पादनावर परिणाम होतो.

Animal Care | Agrowon

खारे पाणी पिल्यामुळे जनावरांच्या शरीरातील द्रव्यघटकातील परासरण दाब वाढतो. परिणामी जनावरांच वजन आणि उत्पादनक्षमतेत घट होते. 

Animal Care | Agrowon

थायरॉइडपासून निघणाऱ्या स्त्रावाच्या प्रमाणात कमतरता होते. हा द्रव शरीरात प्रथिनांच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असल्याने शरीरातील प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या उत्पादनक्षमतेवर होतो.

Animal Care | Agrowon

खारे पाणी पिणाऱ्या गाई आणि नियमित गोडे पाणी पिणाऱ्या गाई यांच्या दुधाच्या उत्पादनात थंड हवामानाच्या वेळी विशेष फरक जाणवत नसला तरी उन्हाळ्यात मात्र खारे पाणी पिणाऱ्या गायीची उत्पादनक्षमता कमी होते.

Animal Care | Agrowon
Onion Diseases | Agrowon