Team Agrowon
लाल भेंडीची लागवड वर्षातून दोनदा करता येते.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मार्चच्या अखेर पर्यंत लागवड केली जाते.
लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी आणि सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असणाऱ्या जमिनीची निवड करावी.
रोपांची वाढ १.५ ते २ मीटर पर्यंत होते. ४० ते ४५ दिवसात फळांचे उत्पादन सुरु होत.
एका झाडाला कमीत कमी ५० फळे लागतात. एक एकर लाल भेंडीच्या लागवडीतून सुमारे ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळत.
लाल रंगामुळे हिरव्या भेंडीच्या तुलनेत या भेंडीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. हिरव्या रंगाच्या भेंडीमध्ये क्लोरोफिल अधिक प्रमाणात असत. त्यामुळे हिरव्या भेंडीवर कीटक जास्त प्रमाणात आकर्षित होतात.
लाल भेंडीमध्ये क्लोरोफिलची मात्रा कमी असते. त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावाच प्रमाण अगदीच अत्यल्प असत.