Vietnam Tour : व्हिएतनामाची ग्रामीण जीवन कसं आहे?

महारुद्र मंगनाळे

ददांग वरून होईयांगला पोचल्यावर,तिथं एका हॉटेलसमोर गाडी लावली.जवळपास निम्मं शहर पालथं घातलं.

Vietnam | Maharudra Mangnale

दुपारी जेवणानंतर लक्षात आलं की,इथं आता पाहण्यासारखं काही नाही.जुन्या होईयान शहरात फ्रेंच कालीन प्राचिन इमारती आहेत.

Vietnam | Maharudra Mangnale

तो अख्खा भाग म्हणजे पर्यटनस्थळ आहे.विविध वस्तुंची दुकानं,कॅफे , रेस्टॉरंट्स आणि निवांत फिरत असलेले पर्यटक.

Vietnam | Maharudra Mangnale

सगळी तिचं रेलचेल.तासाभरात कंटाळलो.मी आशूला म्हटलंही,हे निवृत्त व ज्येष्ठ नागरिकांसाठी छान ठिकाण आहे.

Vietnam | Maharudra Mangnale

खा,प्या,फिरा.पायी नको असेल तर वाहनाने अथवा बोटीत फिरा.नदीकिनारी बसा वा कॅफेत!...आशू मस्त हसला.त्यानं काही वेळ गुगल सर्च केलं आणि म्हणाला,निघू सर.

Vietnam | Maharudra Mangnale

जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून नोंद असलेल्या MYSON या ठिकाणाकडं निघालो.४५कि.मी.चा दुचाकीचा प्रवास करीत आम्ही पोचलो.रस्त्यात चार-पाच गावे लागली.

Vietnam | Maharudra Mangnale

दोन्ही बाजुने भाताची शेती.अधेमधे झाडी.रस्ता छान असल्याने मजा आली.मॅसन बाहेरच्या रेस्टॉरंट मध्ये मी चोकोबार आईस्क्रीम खाल्लं. दोन तिकीट काढून गेटच्या आत प्रवेश केला. =

Vietnam | Maharudra Mangnale

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chatgpt | Agrowon