महारुद्र मंगनाळे
व्हिएतनाम मध्ये बऱ्याच वर्षांपासून वृक्षारोपणाची मोहिम नियोजनबद्ध रित्या राबवली जात असावी,असं दिसतंय.
जंगलातील, रस्त्यालगतच्या झाडांकडं बघितलं की,ही लागवड टप्प्या टप्याटप्याने केली जातेय,हे लक्षात येतं.झाडांच्या वाढीवरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येऊ शकतो.
एकाच पध्दतीच्या रोपांची शेकडो एकरवर ही लागवड दिसते.बहुतेक ही सरकारी लागवड असावी.
रस्त्याच्या बाजुने तारेचे कुंपण आहेच.आतमध्ये झाडांना पाणी देण्याची व्यवस्था दिसते शिवाय देखभाल करणारे लोकही.झाडं ज्या पध्दतीने सरळ वाढताहेत,याचा अर्थच त्यांची वेळोवेळी कटींग केली जातेय.
रस्त्याच्या बाजुने सगळीकडं या झाडांची घनदाट जंगलं निर्माण केली जात आहेत.हे वनीकरण बघितलं आणि भारतातील वनीकरणाचं नाटक बघितलं की, आपल्याला हसू आल्याशिवाय राहात नाही.
इथल्या वनीकरणाच्या कामातील गुणवत्ता ठळकपणे डोळ्यात भरते.झाडं जगवायचं,नीट जोपासायचं याचं व्यवस्थित नियोजन दिसतं.