Team Agrowon
खानदेशात निर्यातीच्या किंवा उच्च दर्जाच्या केळीचे दर तीन हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत.
कमी दर्जाच्या केळीलाही एक हजार ते १२०० रुपये प्रति क्विंटलचा दर जागेवर मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील पंधरवड्यात केळीची प्रतिदिन सरासरी ६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक झाली आहे.
मागील हंगामात फेब्रुवारीच्या अखेरीस प्रतिदिन सरासरी ११० ट्रकवर केळीची आवक झाली होती.
नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनर, चोपडा, जामनेर आदी भागांत पुढील महिन्यात केळीची आवक सुरू होईल.
मागील पंधरवड्यात केळीची आवक आणखी १३ ते १५ ट्रकने कमी झाली आहे.
सध्या उष्णता वाढत आहे. तसंच उत्तर भारतात केळीची मागणी हवी तेवढी नाही.
चोपडा, शिरपूर, यावल भागात निर्यातीसंबंधी काम सुरू आहे. खानदेशातून रोज दोन कंटेनर केळीची निर्यात होत आहे.