खतांचा अनावश्यक वापर कसा टाळाल?

Team Agrowon

पीक लागवडीपासून ते वाढीस असताना त्यांच्या विविध अवस्थांमध्ये पिकात वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करणे फायदेशीर आहे.

Fertilizer Management | Agrowon

स्फुरद, पालाशयुक्त खते पिकास उपलब्ध होण्यास वेळ लागतो. त्यामुळे संपूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळेस द्यावी लागते

Fertilizer Dose | Agrowon

आवश्यकता असल्यास फुलोऱ्याची वेळ, दाणे भरण्याची अवस्था या काळात विद्राव्य खतांची फवारणी केल्यास अधिक फायदेशीर ठरते.

Crop Fertilizer Management | Agrowon

काही भागात अतिवृष्टी झालेली आहे. अशा ठिकाणी उभ्या पिकात पाणी साचलेले आहे. पाणी साचलेल्या जमिनीत खते देऊ नयेत.

Application Of Fertilizers | Agrowon

जमिनीतील अति ओलावा किंवा कमी ओलावा या दोन्ही परिस्थितीत खतांची कार्यक्षमता कमी होते व त्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते.

Fertilizer Use | Agrowon

पाऊस झाल्यावर लगेच किंवा पावसाने मोठी उघडीप दिली असल्यास पिकास खते देणे टाळावे. पावसाचा पूर्व अंदाज घेऊनच खतांचा वापर करावा.

Fertilizer Use | Agrowon

मुख्यत्वे नत्रयुक्त खतांची अर्धी मात्रा पीक लागवडीच्या वेळेस द्यावी. उरलेली अर्धी मात्रा पीक लागवडीपासून ३० दिवसांच्या अंतराने दोन वेळेस विभागून द्यावी.

Fertilizer Use | Agrowon