FarmPond : शेततळ्यासाठी कशी जागा निवडायची?

Team Agrowon

पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी, काळी चिकन मातीचे प्रमाण  जास्त असलेली जमीन शेततळे उभारणीसाठी उपयुक्त असते. 

Farm Pond | Agrowon

साधारणपणे जमिनीच्या उतारावरील जागा शेततळ्यासाठी निवडावी.

Farm Pond | Agrowon

मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळ्यास निवडू नये.

Farm Pond | Agrowon

शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते. 

Farm Pond | Agrowon

खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन शेततळ्यासाठी निवडावी. तसेच सर्व पाणी निवडलेल्या जागेवर एकत्रित येईल असे नियोजन करावे. 

Farm Pond | Agrowon

पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. अशा जागेतील तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.

Farm Pond | Agrowon
Crop Damage | Agrowon