Team Agrowon
दुग्धव्यवसायात गोचीड ही एक सामान्य समस्या आहे. पण त्याचा जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनावर वाईट परिणाम होतो.
गोचीड या जनावरांचे रक्तशोषण करतात. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. गोचीडांच्या चाव्यामुळे टिक पॅरॅलिसिस हा आजार जनावरांना होऊ शकतो.
प्रादुर्भावामुळे सौम्य चिडचिड ते गंभीर आजार आणि अगदी मृत्यूपर्यंत लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच डेअरी फार्मिंगमध्ये गोचिड नियंत्रण महत्त्वाचे आहे,
साधारणपणे गोचीडवर नियंत्रण ठेवण्यासाठी रासायनिक कीटकनाशके आणि ऍकेरिसाइड्सचा वापर करतात.
जनावरांना भेगा किंवा खड्डे नसलेल्या गोठ्यामध्ये ठेवावे.
शेणाचे ढीग आणि विटांचे ढीग नियमितपणे काढून टाकणे
नव्याने खरेदी केलेल्या जनावरांना अलग ठेवणे आवश्यक आहे. टिक्सचा प्रसार रोखण्यासाठी ऍकेरिसाइडने उपचार केले पाहिजेत.
जनावरे साधारणतः ज्या ठिकाणी चरतात त्या ठिकाणी होणारा गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करणे, जनावरांच्या अंगावरील गोचीड काढून जाळून टाकावे