Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल ?

टीम ॲग्रोवन

कापसाला मिळणारा बाजारभाव (Market Rate) हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी (Cotton Picking) करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Cotton | Agrowon

वेचणी सुरु झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रुइमध्ये आढळतो. 

Cotton | Agrowon

या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकवण्यास अडचण निर्माण होते. 

Cotton | Agrowon

कापसाची वेचणी करताना काय काळजी घ्यावी याविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे. 

cotton | Agrowon

वेचणी हि सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही, बोंडे वेचतांना पालापाचोळा चिकटल्यास त्याचवेळी काढावे व स्वच्छ कापूस गोळा करावा. 

Cotton | Agrowon

अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा बोंडातील कापूस वेचून तसाच साठविल्यास रुईला पिवळसरपणा येतो व कापसाची प्रत खालावते. 

Cotton | Agrowon

शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्यामुळे गलाई करतांना सरकी फुटते व ती रुइमध्ये मिसळते व रुईची प्रत खराब होते. 

Cotton | Agrowon

कापसाच्या तसेच रुईच्या दर्जेदार उत्पादनाकरीता वेचणी करतांना पूर्णतः परिपक्व आणि पूर्ण उमललेल्या बोंडातील कापूस वेचणी करावी. 

Cotton | Agrowon

कापसाची वेचणी करतांना झाडाची पाने, इतर झाडांचा पालापाचोळा चिकटून येतो. अशा प्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो. 

Cotton | Agrowon
cta image | Agrowon