Poultry Diseases : कोंबड्यांतील ई-कोलाय रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखायचा?

Team Agrowon

ब्रूडिंग दरम्यान प्रादुर्भाव

ब्रॉयलर कुक्कुटपालनामध्ये दरवर्षी ई-कोलायच्या प्रादुर्भावामुळे ब्रूडिंग दरम्यान ४० ते ५० टक्के पक्ष्यांची मरतुक होते. 

Poultry Diseases | Agrowon

वर्षभरात केव्हाही प्रादुर्भाव

रोगाचा प्रादुर्भाव वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. मात्र हिवाळा आणि पावसाळी ऋतूमध्ये रोगाची लागण होण्याची अधिक शक्यता असते.

Poultry Diseases | Agrowon

प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यामातून रोग नियंत्रण

या रोगाविरुद्ध प्रभावी लस अद्याप तयार झालेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यामातून रोग नियंत्रण करणे फायद्याचे ठरते. 

Poultry Diseases | Agrowon

शवविच्छेदनातील निरीक्षणे

या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांसह इमू, बटेर (क्वेल), बदके इत्यादी पक्ष्यांमध्येही आढळून येतो. त्यांच्यामध्येही साधारणतः अशीच लक्षणे व शवविच्छेदनातील निरीक्षणे दिसतात.

Poultry Diseases | Agrowon

मांसाचा दर्जा ढासळणे

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे वजन कमी होणे, मांसाचा दर्जा किंवा प्रत ढासळणे असे परिणाम दिसून येतात. तसेच ब्रॉयलर पक्ष्यांचे अपेक्षित वजन मिळत नाही.

Poultry Diseases | Agrowon

अधिक आर्थिक नुकसान 

हा रोग कोंबड्यांतील मानमोडी, गंबोरो यांसारख्या रोगांना सहायक ठरतो. त्यामुळे अधिक आर्थिक नुकसान होते. 

Poultry Diseases | Agrowon

अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये वाढ

बाधित पक्ष्यांचे कच्चे मांस किंवा अंडी खाणाऱ्या व्यक्तीला रोगाचा बाधा होण्याची शक्यता असते. या रोगाचे जंतू डोळ्यांची बाधा, अंडी वाहक नलिकेचा दाह, कोलिसेप्टिसेमिया, कोलाय ग्रॅन्युलोमा, सेल्युलायटिस इत्यादी अनेक प्रकारच्या समस्या पक्ष्यांमध्ये निर्माण करतात.  

Poultry Diseases | Agrowon
Bajara | Agrowon