पावसाच्या खंडात पिकातील ओलावा कसा टिकवाल?

Team Agrowon

विहीर किंवा शेततळ्यात पाणी असल्यास पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.

Drip Irrigation | Agrowon

मिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी शेतातील निरोपयोगी काडी, कचरा, धसकटे, आणि गवताचा वापर पिकाच्या दोन ओळीमध्ये करावा.

Mulching | Agrowon

आच्छादनामुळे २५ ते ३० मीमी ओलाव्याची बचत होते. उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते.

Mulching Practices | Agrowon

पिकांच्या अवस्थेनुसार हलक्‍या कोळपण्या कराव्यात, पिकांना मातीची भर द्यावी.

Crop Management in Water Stress Condition | Agrowon

पिकाची खालील पाने कमी करावीत आणि वरील चार ते पाच पाने ठेवावीत त्यामुळे पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होते.

Moisture Conservation | Agrowon

उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा आणि अन्नद्रव्यासाठी पिकांची स्पर्धा वाढते आणि ओलावा कमी पडल्यास सर्व पिकांचे नुकसान होते.

Moisture Conservation | Agrowon

पिकाच्या फुलोरा ते दाणे भरण्याच्या वेळी एकास तीन प्रमाणात रोपांची संख्या कमी करावी.

Moisture Conservation | Agrowon