Fruit crop Mulching : फळबागेत आच्छादनांचा वापर कसा करावा?

Team Agrowon

जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत

उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते. आच्छादनांचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते.

Mulching of Fruit crop | Agrowon

पॉलिथीन फिल्मचे आच्छादन

पॉलिथीन फिल्मच्या आच्छादनामुळे तणांची वाढ होत नाही. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

Mulching of Fruit crop | Agrowon

सेंद्रिय आच्छादनाची जाडी

सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सें.मी असावी. सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

Mulching of Fruit crop | Agrowon

सेंद्रिय घटकांचा वापर

आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भाताचे तुस अशा सेंद्रिय घटकांचा वापर करावा.

Mulching of Fruit crop | Agrowon

सेंद्रिय खत

सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते.

Mulching of Fruit crop | Agrowon

आच्छादनाचे फायदे

आच्छादनांमुळे जमिनीची धूप कमी होते, भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरित्या उपयोग होतो.

Mulching of Fruit crop | Agrowon

उत्पादनात वाढ

आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविता येतो. आच्छादनांमुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.

Mulching of Fruit crop | Agrowon
Cashaw | Agrowon