Summer Ragi Cultivation: कसा यशस्वी ठरला उन्हाळी नाचणी लागवडीचा प्रयोग?

Team Agrowon

उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग

भरडधान्याचं उत्पादन वाढाव आणि लोकांच्या आहारातही त्याचा वापर वाढावा यासाठी अलीकडेच कोल्हापूरात उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग झाला.

Summer Ragi Cultivation | Agrowon

उत्पादनात वाढ

या प्रयोगांतर्गत कोल्हापूरातील १५ शेतकऱ्यांनी नाचणीचं खरीप पीक असूनही उन्हाळी हंगामात लागवड करुन चांगल उत्पादनही घेतल आहे. 

Summer Ragi Cultivation | Agrowon

इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक

शेतकऱ्यांपैकी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रा गावचे  मिलिंद पाटील हे प्रयोगशिल शेतकरी. त्यानी उन्हाळी नाचणी लागवड प्रयोगात यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहेत. 

Summer Ragi Cultivation | Agrowon

कृषी विभागाचे प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात नाचणी हे पीक खरिपात घेतले जाते. नाचणीचा स्वतःच्या घरातच उपयोग कमी होत गेल्याने आणि व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी किमतीत खरेदी होत असल्याने या ठिकाणी नाचणीचा पेरा घटत गेला. त्यामुळे नाचणी उत्पादक शेतकरी कुटुंबाला नाचणीचं महत्त्व समजाव यासाठी येथील कृषी विभागाने प्रयत्न सुरु केले. 

Summer Ragi Cultivation | Agrowon

थेट नाचणीची विक्री

शहरातील मॉल्स, सुपर मार्केटमध्ये नाचणीला किलोला ६५ ते ७० रुपये भाव मिळतो हे लक्षात घेऊन मिलींद पाटील यांनी इतर शेतकऱ्यांना सोबत घेत शहरी भागातील ग्राहक शोधून त्यांना थेट नाचणीची विक्री सुरु केली.

Summer Ragi Cultivation | Agrowon

उन्हाळी नाचणी लागवड नियोजन

उन्हाळी नाचणी लागवडी बाबत यापूर्वी संशोधन न झाल्याने कुठेही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे या नोंदीच पुढील उन्हाळी नाचणी लागवड नियोजनात दिशादर्शक ठरल्या. 

Summer Ragi Cultivation | Agrowon
Milk | Agrowon