Alamatti Dam : ‘अलमट्टी’ची उंची वाढवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने घेतला आहे. धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर व सांगली जिल्हा कायम स्वरूपी पाण्याखाली जातील.

Alamatti Dam | Agrowon

 त्यामुळे ‘अलमट्टी’ची उंची वाढवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांच्याकडे करण्यात आली.

Bommai | Agrowon

ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

Shahu Palace | Agrowon

बोम्मई यांना दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या काही वर्षात कर्नाटकातील अल्लमट्टी धरणाला लागून असलेल्या गावांना तसेच महाराष्ट्रातील कृष्णाकाठच्या गावांना पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. 

Krushna River | Agrowon

विशेषतः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे येथील औद्योगिक आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

Crop Damage | Agrowon

सध्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या नद्या या मातीने भरल्या होत्या. गाळामुळे या नद्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊन ते पाणी परिसरात पसरले.

Crop Damage | Agrowon

अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे लगतच्या भागात परत पाणी पसरण्याची शक्यता आहे. पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Crop Damage | Agrowon

अलमट्टीमध्ये साठलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी तुमचे सरकार पुढे येत असले तरी या नैसर्गिक घटकांमुळे जास्त पाणी आणि पूर यांच्यावरील तुमच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो.

Almatti Dam | Agrowon

अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असे निवेदनात नमूद आहे. प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्डवान्नावर, बंडू पाटील, तानाजी वठारे आदी उपस्थित होते.

Sawkar Madnaik | Agrowon
cta image | Agrowon