Rice Export : भारत ठरला चीनचा मुख्य तांदूळ पुरवठादार

टीम ॲग्रोवन

भारताची चीनला तांदूळ निर्यात वाढली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान भारतानं चीनला तांदूळ पुरवठा करण्यात व्हिएतनामला मागे टाकले.

Rice Sowing | Agrowon

यंदा चीनला तांदळाचा पुरवठा करणारा प्रमुख देश म्हणून भारत पुढं आला आहे. मात्र 9 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील काळात निर्यात कमी होऊ शकते.

Rice Market | Agrowon

चीनच्या जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ कस्टम्सच्या मते, यावर्षी चीनच्या तांदूळ आयातीत ४२.५ टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत चीनने ४.५६ दशलक्ष टन तांदूळ आयात आली आहे.

Rice Storage | Agrowon

मात्र या आयातीचं मूल्य ११.५ टक्क्यांनी घटलं आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत चीनने ३.२ दशलक्ष टन तांदळाची आयात केली होती. २०२० च्या तुलनेत ही आयात दीड पटीने जास्त होती.

Rice Export | Agroron

चीनने तुकडा तांदळाची आयात सर्वाधिक केल्याचं दिसतं. कारण या तांदळापासून नूडल्स आणि पशुखाद्य तयार केलं जातं.

Chines Food | Agrowon

चीनच्या या आयातीवर तिथल्या प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, चीनमध्ये तांदळाचा मुख्य अन्नात समावेश होत असल्याने तांदळाची आयातही जास्त होते.

Chines Rice | Agrowon

लाटेमुळे जगभरात अन्नधान्याचं उत्पादनही घटल्याचे चित्र समोर होते. त्यामुळे चीनने जुलैमध्ये ७० टक्क्यांनी तर ऑगस्टमध्ये ३४.८ टक्क्यांनी तांदळाची आयात वाढवली.

Rice Storage | Agrowon

अपेडाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-जुलै या कालावधीत चीनने भारतातून सर्वाधिक तांदूळाची आयात केली होती.

APEDA | Agrowon

चीनने या कालावधीत जलपास १.०७ दशलक्ष टन तांदळाची खरेदी केली होती. या तांदळाच्या आयातीचे मूल्य १.९० अब्ज डॉलर इतके होते.

Rice Market | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon