Fertilizer Market : भारताने रशियाकडून खत आयात वाढवली

Anil Jadhao 

मागील आर्थिक वर्षात जगातील एकूण पोटॅश निर्यातीपैकी रशिया आणि बेलारुसचा वाटा तब्बल ४० टक्के होता. तर रशियाने २२ टक्के अमोनिया, १४ टक्के युरिया आणि १४ टक्के एमएपी निर्यात केला.

चालू वर्षात भारताने रशियाकडून खत आयात वाढवली. यामुळे दोन्ही देशांना फायदा झाला. भारताला जागतिक बाजारातील दरापेक्षा जवळपास ७० डाॅलर प्रतिटनाने खते स्वस्त मिळाली.

जून महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपीचा दर वाहतुकीसह १ हजार डाॅलर प्रतिटन होता. मात्र भारताला रशियाकडून ९२० ते ९२५ डाॅलर प्रतिटनाने खत मिळाले.

मागील आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारताने एकूण १०२.७ लाख टन खत आयात केली होती. मात्र यंदा त्यात २.४ टक्क्यांनी वाढ होऊन १०५ लाख टनांवर पोचली.

चीनकडून होणारी खत आयात १७.८ लाख टनांनी घटली. चीनसह जाॅर्डन, इजिप्त आणि युएईकडून होणारी आयातही कमी झाली. मागील हंगामात भारताच्या एकूण खत आयातीत चीनचा वाटा २४ टक्के होता, तर रशियाचा वाटा ६ टक्के होता.

यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये रशियाचा वाटा २१ टक्क्यांवर पोचलाय. भारताने रशियाकडून २१.५ लाख टन खत आयात केले. तर मागील आर्थिक वर्षात भारताने रशियाकडून १२.६ लाख टन खत आयात केले होते.

cta image