Sugar Export : अमेरिकेला भारतातून साखर निर्यात होणार

Team Agrowon

अमेरिकेला भारतातून साडे आठ हजार टन साखर निर्यात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sugar Export | Agrowon

पण ही निर्यात दोन देशांतील मैत्रीपूर्ण कराराचा एक भाग आहे. त्यामुळे अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढण्याची शक्यता नाही.

Sugar Export | Agrowon

कारण अमेरिकेच्या शेजारी ब्राझील आहे. ब्राझील हा जगात सगळ्यात जास्त साखर निर्यात करतो.

Sugar Export | Agrowon

त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातून साखर आयात करणे अमेरिकेला परवडत नाही.

Sugar Export | Agrowon

ती खूप महाग पडते. त्यामुळे साडे आठ हजार टनाची निर्यात हा केवळ सदिच्छेचा भाग आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

Sugar Export | Agrowon

अमेरिका हा काही आपला प्रमुख आयातदार देश नाही. आपली साखर बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या आशियायी देशांमध्ये जाते. तसेच आखाती देशदेखील मोठ्या प्रमाणात भारतीय साखर विकत घेतात.

Sugar Export | Agrowon
cta image | Agrowon