Edible oil Rate : भारताची खाद्यतेल आयात वाढणार

Anil Jadhao 

देशात २०२१-२२ या तेल विपणन वर्षात म्हणजेच नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत जवळपास १४० लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये देशात २६ लाख टन खाद्यतेलाचा साठा होता.

देशातील खाद्यतेलाचा साठा यंदा जास्त आहे. त्यामुळे यंदा १३० ते १३५ लाख टन खाद्यतेल आयात होईल.

सध्याच्या साठ्याचा विचार केल्यास देशाची ४० दिवसांची गरज भागेल. हा शिल्लक साठा आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी १४० लाख टन आयात झाल्याने शिल्लक साठा जास्त असल्याचं मेहता यांनी सांगितले.

पुढील पाच वर्षात देशातील खाद्यतेल वापर वाढीचा वेग सरासरी २ ते ३ टक्क्यांच्या दरम्यान राहील. ही वाढ लक्षात घेतल्यास २०२५-२६ मध्ये देशाला वार्षीक २५५ ते २७० लाख टन खाद्यतेलाची गरज भासेल.

देशातील तेलबिया उत्पादन ३८० ते ४०० लाख टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर देशातील खाद्यतेलाचं उत्पादन या काळात ३० लाख टनांनी वाढून १३५ ते १४० लाख टनांपर्यंत पोचेल.

देशातील मागणी आणि पुरवठ्याचा करता देशातील खाद्यतेल उत्पादन केवळ निम्मीच गरज पूर्ण करू शकेल. तर निम्मी गरज भारताला आयातीतून पूर्ण करावी लागेल.

cta image