Mango Season : आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आला का?

Team Agrowon

पेटीचा दर

आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून आंब्याचा तुटवडा असल्यामुळे पेटीचा दर साडेतीन ते चार हजारांवर स्थिर राहिला आहे.

Mango Season | Agrowon

कॅनिंगच्या आंब्याचा दर

कॅनिंगच्या आंब्याचा दर देखील प्रतिकिलो ६० रुपये आहे. पूर्व पट्ट्यातील आंबा अजूनही बाजारपेठेत आलेला नाही.

Mango Season | Agrowon

आंब्याची आवक

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून किरकोळ आंबा बाजारपेठेत येऊ लागला. पहिल्या टप्प्यातील आंब्याची आवक मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर वाढली. त्यावेळी साडेचार हजारांपर्यंत पेटीचा दर होता.

Mango Season | Agrowon

देवगड हापूस चा दर

देवगड हापूसकरिता ओळखल्या जाणाऱ्या देवगड बाजारपेठेत प्रतिडझन १ हजार ते १२०० रुपये दर होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारपेठेत आला. याचवेळी जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

Mango Season | Agrowon

मोहोराचे प्रचंड नुकसान

तिसऱ्या टप्प्यातील मोहोराचे प्रचंड नुकसान झाले.त्यामुळे मे मध्ये येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील आवक कमी झाली. सध्या अतिशय किरकोळ स्वरुपातील आंबा बाजारपेठेत येत आहे.

Mango Season | Agrowon

आंब्याचे दर काहीसे कमी झाले

मे च्या दुसऱ्या आठवड्यात पूर्व पट्ट्यातील आंबा बाजारपेठेत येतो.त्या कालावधीत आंब्याचे दर काहीसे कमी होतात.

Mango Season | agrowon

आंब्याचे दर टिकून

पूर्व पट्ट्यातील आंबाच अजूनही बाजारपेठेत न आल्यामुळे आणि देवगड परिसरातील आंब्याची आवक कमी असल्याने आंब्याचे दर आजही प्रतिपेटी साडेतीन ते चार हजारांवरच टिकून आहेत.

Mango Season | Agrowon
Cashew | Agrowon