Milk Rate : दूध विक्रीसाठी किती दर मिळतोय ?

टीम ॲग्रोवन

पुणे : दूध विक्री दरात वाढ करताना ग्राहक किंमत (एमआरपी) रुपये ५४ पेक्षा जास्त नसावी. तसेच डीलर ते ग्राहकांना दिली जाणारी किंमत यामध्ये पाच रूपयांपेक्षा जास्त अंतर नसावे, यातून दरवाढीचा भार ग्राहकांवर पडणार नाही.

Milk Industry | Agrowon

दूध खरेदी-विक्री दरात एकसूत्रतेचा अवलंब सर्वांनी करावा, असे धोरण राज्यभरातील खासगी तसेच सहकारी दूध संघाकडून एकमताने ठरविण्यात आले.

Milk Industry | Agrowon

परराज्यातील दूग्ध व्यवसायिकांचे राज्यातील होणारे आक्रमण त्यातून दूध खरेदी विक्रीच्या दरावर होणारे परिणाम तसेच अनिष्ट स्पर्धा व इतर अडी-अडचणींबाबत राज्यातील

Milk Industry | Agrowon

सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज डेअरी येथे झाली.

Milk Industry | Agrowon

या बैठकीत संघाचे अध्यक्ष मस्के, पुणे दूध उत्पादक संघाचे राहुल दिवेकर, सोनाईचे धैर्यशील माने, चितळे दूध समुहाचे श्रीपाद चितळे, इत्यादी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Milk Industry | Agrowon

या वेळी सदर धोरण ठरविण्यात आले. या प्रसंगी कात्रज संघटनेचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी आभार मानले.

Milk Industry | Agrowon

या वेळी राज्य सरकारने दूध उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण आणावे. यासाठी प्रयत्न करणे, शासन नियुक्त संयुक्त समितीच्या नियमितपणे बैठका व्हाव्यात. 

Milk Industry | Agrowon

पनीरसह दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळखोरांना रोखण्यासाठी संयुक्त फिरते पथक असावे, या मुद्यांवरही या बैठकीत धोरण सर्वानुमते ठरविण्यात आले.

Milk Industry | Agrowon

पनीरसह दुग्धजन्य पदार्थाच्या भेसळखोरांना रोखण्यासाठी संयुक्त फिरते पथक असावे, या मुद्यांवरही या बैठकीत धोरण सर्वानुमते ठरविण्यात आले. 

Milk Industry | Agrowon
cta image | Agrowon