Jowar Rate : ज्वारीची आवक घटली

Anil Jadhao 

राज्यात मागील रब्बी हंगामात जास्त उष्णतेनं ज्वारी पिकाला फटका बसला होता. त्यामुळं उत्पादन कमी राहिल्यानं सध्या काहीसा तुटवडा असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

राज्याच्या बाजारात ज्वारीची आवक सध्या कमी झालेली आहे. मात्र ज्वारीला मागणी टिकून आहे.

पुणे, मुंबई, सोलापूरसह काही महत्वाच्या बाजारांमध्ये ज्वारीची आवक १०० ते ३०० क्विंटलच्या दरम्यान होतेय.

राज्यातील इतर छोट्या बाजार समित्यांमधील आवक कमी आहे. या बाजारांतील आवक दैनंदीन सरासरी १० ते १५ क्विंटलपेक्षा कमीच आहे.

सध्या बाजारात ज्वारीची आवक कमी आणि मागणी जास्त असं समिकरण झालय. त्यामुळं दरही चांगले आहेत.

राज्यात रबी हंगामात ज्वारीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. पण सध्या ज्वारीला २ हजार ५०० ते ४ हजार रुपये सरासरी दर मिळतोय.

cta image