Jowar Rate: देशात ज्वारीचे दर तेजीत

Anil Jadhao 

देशात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. यंदा खरिपातील ज्वारी उत्पादन कमी झाले होते.

अनेक महत्वाच्या ज्वारी उत्पादक भागांमध्ये परतीचा पाऊस चांगला झाला.

रब्बी ज्वारी लागवडीला उशीर झाला. राज्यातही काही भागांमद्ये ज्वारी लागवडीला उशीर झाला होता.

परिणामी रब्बीतील ज्वारी उत्पादनही कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय.

यंदा ज्वारीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.