Kabuli Chana Market: काबुली हरभरा दर तेजीत

Anil Jadhao 

देशात मागील वर्षभर हरभरा दर दबावात आहेत. मात्र काबुली हरभऱ्याची टंचाई असल्याने दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला मागणी चांगली आहे.

पण काबुली हरभरा दर १३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे गेल्यानं नफावसुली सुरु झाली. १० हजार रुपयांच्या खाली खरेदी केलेला माल स्टाॅकिस्टनी या दरात बाजारात आणण्यास सुरुवात केली.

काबुली हरभरा दरात क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते. पण आता दर कमी झाल्यानंतर आखाती देश आणि इतर काही देशांकडून काबुली हरभऱ्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

देशातील नवा काबुली हरभरा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच अजून दोन महिन्यांचा कालावधी लागेल.

उद्योगाच्या मते यंदा देशातील काबुली हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं स्टाॅकिस्ट त्याआधीच बाजारात माल आणण्याची शक्यता आहे.

पुढील काळात काबुली हरभरा १२ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जाईल. पण बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.