Soil Testing : नव्या फळबाग लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण करताना या बाबी लक्षात ठेवा

Team Agrowon

फळझाडांची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे खोल मातीची जमीन असणे आवश्यक आहे.

Soil Testing | Agrowon

मातीतून होणारा पाण्याचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. तो चांगला होत नसल्यास अशा जमिनीत पावसाळ्यात पाण्याची पातळी जास्त कालावधीपर्यंत वर असते.

Soil Testing | Agrowon

बहुतेक फळपिकांसाठी पोयटा किंवा वालुकामय पोयटा या प्रकारचा पोत असलेली माती सर्वोत्तम मानली जाते.

Soil Testing | Agrowon

जमिनीच्या प्रकारानुसार किंवा गुणधर्मानुसार सर्वप्रथम जमिनीचा रंग, चढ-उतार, खोली आदी बाबींमधील फरक लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेताचे निरनिराळे विभाग पाडावेत.

Soil Testing | Agrowon

वरीलप्रमाणे सारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या मध्यभागी ९० सेंमी (३ फूट) खोल अथवा कठीण मुरूम अथवा खडक लागेपर्यंत यापैकी जे कमी असेल तेवढा खोल खड्डा खणावा. त्यामधून मातीचा नमुना घ्यावा.

Soil Testing | Agrowon

फळबागेखाली असलेले क्षेत्र, मशागत, लागवडीपासून जोपासना करण्यासाठी सुरुवातीची सुमारे चार ते पाच वर्षे होणारा लाखो रुपयांचा खर्च या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

Soil Testing | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Market | Agrowon