Team Agrowon
रब्बी हंगामात कांद्याची लागवड केल्यास हवामानामुळे कांद्याची प्रत चांगली मिळते याशिवाय उत्पादन अधिक मिळतं.
ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात बियाणे पेरून रोपाची पुनर्लागवड डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी लागवड केली तर एप्रिलमध्ये काढणी होते. पाती आणि कांद्याची सुकवण चांगली होते सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो.
कांदा लागवडीला शिफारशीत कालावधी पेक्षा उशिरा झाला तर उत्पादनात घट येते. त्यामुळं कांद्याची वेळेवर रोपं तयार करणं आणि रोपांची वेळेवर पुनर्लागवड करणं हे चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे.
कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. शेताची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडावीत. त्यानंतर वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपांची पुनर्लावड करावी. लागवडीपूर्वी सपाट वाफ्यात हलके पाणी देऊन नंतरच लागवड करावी.