Team Agrowon
- विकास गोडगे
नवीन देश, नवीन संस्कृत्या पादाक्रांत करत.
संस्कृती खेड्यांची असते, आदिवासी पाड्यांची, रानांची असते, जंगलांची असते.
ह्या कोणत्याही संस्कृत्यांचा भाग न बनता आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून फक्त चालत राहवं.
तुला सावकाश कळेल की आपले पाय स्वतःचा भार सोसू शकतात आणि जमिनीशी स्पर्शाचे नाते निर्माण करू शकतात.
शरीराला लागणारी हवा, पाणी आणि अन्न हे खूप उपलब्ध आहे, त्यासाठी आयुष्य वाया घालवण्याची गरज नाही.
अथक चालल्यानंतर तुझ्या शरीरावर गरज नसताना चढलेली चरबी गायब झालेली असेल, मनावर चढलेले भीतीचे मळभ नष्ट झालेले असतील.