Team Agrowon
कदंबाचे झाड भारतासह नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार या देशांत आढळते.
कदंबाची फुले नारिंगी, लहान व सुवासिक असतात.
कदंबाचे फूल आणि फळ हे एकच असते. उन्हाळ्याच्या दिवसांत कदंबाच्या झाडाला फुले येतात.
कदंबाची फळे खाण्याजोगी असली, तरी चवदार नसतात. मात्र, यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात.
कदंबाच्या झाडाची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. याची साल त्वचा रोग बरा करण्यासाठी अत्यंत गुणकारी समजली जाते.
तसेच सर्दी, खोकला, जळजळ आणि पित्त दाहाच्या आजारातही याचा गुण येतो.
कदंबाचे लाकूड टिकाऊ नसल्याने ते होड्या, खोकी, तक्ते, फळ्या, आगपेट्या व काड्या तसेच कागद, सजावटी सामान यासारख्या वस्तू बनविण्यासाठी वापरतात.