Team Agrowon
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिलं आहे.
काँग्रेसने १३६ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर, भाजपला अवघ्या ६४ जागांवर आघाडी मिळाली आहे.
निवडणुकीच्या सुरुवातीपासून प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार-माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी हातात हात घेऊन प्रचार केला.
काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण त्यांनी आपल्या नेतृत्वाची झलक या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिली.
काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध करताना अल्पसंख्याक समाजाच्या लोकांकडे विशेष लक्ष दिले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी सलग्न असलेली बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी करत त्याच्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०० युनिट वीज मोफत आणि महिलांना दरमहा २००० रुपये पेन्शन देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
काॅंग्रेसने महिलांना सार्वजनिक बससेवा मोफत आणि बेरोजगार तरुणांना दरमहा ३ हजार रुपये भत्ता देणअयाचे आश्वासन दिले होते.