लेप्टोस्पायरोसिस आजार कसा टाळावा?

Roshani Gole

बाधित जनावरांचे मुत्र या आजाराच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. आजाराने बाधित जनावराच्या मूत्राद्वारे जवळपास ४० दिवस या रोगाचे जंतू बाहेर पडत असतात.

Agrowon

अति पावसाच्या प्रदेशात किंवा पाणथळ जागी जेथे पाणी साठून राहते तसेच ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Agrowon

या आजाराचा प्रादुर्भाव तत्काळ तीव्र, तत्काळ सौम्य आणि दिर्घकालीन तीव्र या तीन टप्प्यामध्ये दिसून येतो. लहान वयाची वासरे या रोगाला पटकन बळी पडतात.

Agrowon

या आजाराचे निदान करण्यासाठी जनावरांच्या लघवीमधील रोगजंतूचा प्रादुर्भाव तपासून निदान करता येतो.

Agrowon

शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत. लक्षणानुसार प्रभावी प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत.

Agrowon

या आजाराचा प्रसार प्रामुख्याने पिण्याचे पाणी, गवत, चारा यांवर आजारी जनावरांचे मुत्र, गर्भाशयाचा स्त्राव पडल्याने होत असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon