Lumpy Skin : लम्‍पी स्कीन रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग तत्पर

Team Agrowon

लम्पी रोगासंदर्भात (Lumpy Skin) प्रतिबंध, नियंत्रण व निर्मूलनासाठी शहरातील जनावरांची पाहणी (Animal Inspection) करून आढावा घेण्यात आला. यामध्ये पशुसंवर्धन (Department Of Animal Husbandry), महसूल तसेच पोलिस प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले होते.

माथेरानमध्ये एकाही गुरांला लम्पी (Lumpy Skin) सदृश लक्षण असून सतर्कता राखण्याबाबत पशुपालकांना सूचना देण्यात आल्‍या आहेत.

माथेरानमधील पशुधन विकास, महसूल, पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी गोशाळेला भेट देत तपासणी केली.

एकाही गायीला लम्‍पी सदृश लक्षणे आढळली नाहीत. माथेरानमध्ये ४० हून अधिक पाळीव गुरे आहेत. जून महिन्यात गोशाळेतील जनावरे काढून मालकांनी आपल्या गोठ्यात बांधण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील गोवंशीय पशूंची तपासणी केली आहे. एकाही गुराला आजाराची लागण झालेली नाही. मात्र गोपालकांना सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेण्याबाबत सूचना केल्‍या आहेत.डॉ. अमोल कांबळे, पशुधन विकास अधिकारी, माथेरान

माथेरानमध्ये गुरांमध्ये लंपी आजार आढळला नाही. जनावरांचा बाजार, शर्यती, प्रदर्शन आदी कार्यक्रमास प्रतिबंध असून नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास कडक कारवाई करण्यात येईल.दीक्षांत देशपांडे, महसूल अधीक्षक

cta image