Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत १५ हजार ७८८ पशुधनाचा मृत्यू

Team Agrowon

नुकसानभरपाई म्हणून ५ हजार ३१८ पशुपालकांना १३ कोटी ६५ लाख रुपये बॅंक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रसाद सिंह यांनी दिली.

Lampi Skin Disease of Animals | Agrowon

राज्यात ‘लम्पी स्कीन’ची बाधा झाल्यापासून ३३ जिल्ह्यांमधील बाधित गावांतील एकूण २ कोटी ३७ लाख ८२९ बाधित पशुधनापैकी १ कोटी ६ लाख ७० हजार पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत.

Lumpy Skin | Agrowon

‘लम्पी स्कीन’चा फैलाव होऊ नये आणि तो आटोक्यात राहण्यासाठी तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती.

Lumpy Skin | Agrowon

लसीकरणामध्ये १ कोटी ४४ लाख १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Lumpy Skin | Agrowon

खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणानुसार राज्यातील सुमारे ९८ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.’’

Lumpy Skin | Agrowon

जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशीम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

Lampi Skin Disease of Animals | Agrowon
cta image | Agrowon