Lumpy Skin : जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन'चा प्रसार

टीम ॲग्रोवन

तालुक्यातील मांडवे येथील शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्कीनसदृश लक्षणे (Lumpy Skin Symptoms In Pet) आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry) गुरुवारी (ता. २२) आजूबाजूच्या गावांची पाहणी केली.

शेतकऱ्यांना या आजारासंबंधी माहिती देऊन जनावरांच्या लसीकरणावर (Lumpy Vaccination) भर दिला आहे.

मांडवे येथील पाळीव जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजारसदृश लक्षणे आढळून आली. त्या संशयित जनावरांच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून या पंचक्रोशीतील ६४ जनावरांना तातडीने लसीकरण करण्यात आले.

तसेच गुरुवारी सकाळपासूनच मांडवे, तळेसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जनावरांची पाहणी करण्यात आली, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी दिली.

त्या संशयित जनावरांचे रक्तांचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके निदान होणार असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

cta image