Krushik Exhibition : महादेव जानकरांनी दिली कृषिक प्रदर्शनाला भेट

Team Agrowon

महादेव जानकर व कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांनी आज बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र ने आयोजित केलेल्या कृषीक प्रदर्शनाला भेट दिली. ही भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Krushik Exhibition | Agrowon

डॉ. शरद गडाख कुलगुरू डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी भेट दिली.

Krushik Exhibition | Agrowon

ज्या पद्धतीने कृषिक प्रदर्शन आयोजित करते, ते पाहून खूप मनाला आनंद वाटला. अशा प्रकारचे जिवंत प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना इतर गोष्टी सांगण्याची गरज पडणार नाही असे मला व्यक्तीश: वाटते. असंही ते म्हणाले.

Krushik Exhibition | Agrowon

कृषि प्रदर्शनात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक ई विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली.

Krushik Exhibition | Agrowon

170 एकरवरती असलेले सर्व प्रक्षेत्र शेतकरी शिस्तबद्ध रित्या पाहताना दिसले. हे शेतकरी विविध भजीपला पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्लॉट, फुलपिकातील विविध वान, त्याची लागवड पद्धत, मतिविणा शेतीचे प्रयोग, ग्रीनहाऊस मधील पिके, भरडधान्य व त्याचे प्रक्रिया पदार्थ, मत्स्य पालन ई. सह स्टॉल वरील माहिती योग्य रीतीने घेत होते.

Krushik Exhibition | Agrowon

विषेश करून Digital Tunnel या बद्दल शेतकर्यांची उस्तुकता दिसून येत होती. कृत्रिम बुद्धीमतत्तेवर आधरित भविष्यातील शेती कशी असेल याची चाहूल शेतकर्यांना लागली असल्याचे जाणवले.

Krushik Exhibition | Agrowon

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शेतीवरील खर्च कमी करण्याचे शास्वत शेतीचे तंत्रज्ञान पाहून त्याची माहिती शेतकरी घेत असल्यचे दिसले.

Krushik Exhibition | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Exhibition | Agrowon