Maharudra Mangnale: पावसाने जीव जेरीस आणला!

महारुद्र मंगनाळे

रात्रीचा पाऊस तासभर पडून साधारण साडेबारा वाजता थांबला.निसर्गाचं रौद्र रूप बघण्यासारखं होतं. खिडकीतून गदगदा हलणारी झाडं विजांचा चकचकाट झाली की दिसायची.

Nature | Maharudra Manganle

पाऊस थांबल्यावर विजेरी घेऊन बाहेर येऊन बघितलं,सगळीकडं पाणी वाहात होतं.पश्चिमेला अगदी समोर विजा चमकत होत्या.गडगडत होतं.मनोमन अंदाज केला..आणखी पाऊस येणार!

Nature | Maharudra Manganle

मच्छरदाणीत येऊन पडलो पण झोप येईना.यु ट्युबवर तलत महमूद यांची गाणी ऐकत डोळे झाकून पडून राहिलो.फार तर अर्धा तास झाला असेल पत्र्यावर पावसाचे थेंब वाजत होते.

Nature | Maharudra Manganle

हा पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे होता.वाऱ्याच्या झोतासोबत जाळीच्या खिडकीतून पावसाचा सपकारा मच्छरदाणीवर आला.लगेच उठून काचेची खिडकी लावली... पुन्हा पत्र्यावरचं संगीत ऐकत बसलो.पत्र्यावरचे आवाज सांगतात की,पाऊस किती मोठा आहे...झड आहे...मध्यम आहे...

Nature | Maharudra Manganle

अंदाज बांधण्यात एक वेगळीच मजा असते... पडल्या जागी नेमक्या कोणत्या वेळेला डोळे झाकले ते कळलं नाही.

Nature | Maharudra Manganle

पहाटे पाचच्या अलार्मने जागं केलं.पण डोळ्यात झोप होती.तसंच उठून अंदाज घेतला.लाईट नव्हती.. अंधारात कशाला बाहेर जायचं,असा विचार करीत तसाच लोळत पडलो. पावणेसहाला उठून बाहेर आलो.

Nature | Maharudra Manganle
banana | Agrowon