Anil Jadhao
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज पुणे बंदची हाक दिली आहे.
या बंदमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा सहभाग असणार आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील आणि इतरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.
या बंदला पुण्यातील सर्व व्यापारी संघटना, वाहतूक संघटना, गणेशोत्सव मंडळांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.
आज पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केटही बंद राहणार आहे.
विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जबरदस्ती करण्यात येणार नाही.