Maize Market : मक्याचा बाजारभाव सध्या टिकून

Anil Jadhao 

खरिपातील मका आवक सध्या बाजारात वाढत आहे. मात्र आवक सरासरीपेक्षा कमीच आहे.

खरिपातील मका पिकाला यंदा पावसाचाही फटका बसला आहे. त्यामुळे खरिपातील मका उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

रब्बीतील मका पेरणीचा वेग सध्या गेल्यावर्षीपेक्षा २३ टक्क्यांनी अधिक दिसत आहे.

पण शेवटच्या टप्प्यात रब्बी मक्याचा पेरा कसा राहतो? यावर बाजार अवलंबून राहील.

सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

पुढील काळात मका दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

cta image