Maize Market : देशातील मक्याचा बाजार दबावात

Anil Jadhao 

युक्रेनने रशियाच्या सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला केल्याननंतर रशियाने धान्य निर्यात करारातून माघार घेत युक्रेनमधून होणारी निर्यात पुन्हा बंद केली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याच्या वायद्यांमध्ये सुधारणा होत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर वाढत आहेत. मात्र देशातील दर काहीसे दबावात आहेत. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत दर चांगलेच आहेत, असं म्हणावं लागेल.

सध्या देशात खरिपातील मक्याची आवक सुरु झाली. आवकेचा दबाव सध्या दक्षिणेतील बाजारात आहे. मात्र महाराष्ट्रातील बाजारातही नवा मका विक्रीसाठी येत आहे. नव्या मालाच्या हंगामाचा दबाव बाजारावर येत असून त्यामुळे दर दबावात असल्याचं जाणकार सांगतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील वर्षभरात मक्याच्या दरात मोठे चढ-उतार होत राहीले. काल मक्याच्या दराने ६८० डाॅलरचा टप्पा गाठला होता.

देशात जास्त ओलावा असलेल्या मक्याला सध्या प्रतिक्विंटल १ हजार ५५० ते १ हजार ७५० रुपये दर मिळत आहे. तर ओलावा कमी असलेल्या मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ९०० ते २ हजार १०० रुपये दर मिळतोय.

ऐन आवकेच्या हंगामातही मका २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

cta image