Malegaon Yatra : 'यळकोट यळकोट जय मल्हार'च्या जयघोषात माळेगाव यात्रेचा प्रारंभ

Team Agrowon

अंगावर चाबकाचे फटके ओढणारे वारु.... संबळाच्या तालावर नाचणारे.... गोंधळी.... मुरळी.... भंडारा खोबर्यांची उधळण व यळकोट यळकोट जय मल्हार चा जयघोष करत लाखोंच्या संख्येने उपस्थित झाले.

Malegaon Yatra | Agrowon

भाविक मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने उसळलेल्या जनसागराच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पालखीच्या पूजनाने श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेचा प्रारंभ झाला.

Malegaon Yatra | Agrowon

ग्रामविकास अधिकारी श्री धुळगुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाविक व यात्रेकरू उपस्थित होते.

Malegaon Yatra | Agrowon

मागील तीन वर्षांपासून कोरोणा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरवण्यात आली नव्हती

Malegaon Yatra | Agrowon

तीन वर्षांच्या खंडानंतर भरणाऱ्या यात्रेत मोठ्या प्रमाणात व्यापारी, भाविक व यात्रेकरू दाखल झाले आहेत,यात्रेचे आकर्षण असलेले अश्व, गाढव, उंट यात्रेत दाखल झाले आहेत मात्र लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर गोवंश यात्रेत प्रतिबंध आहे,

Malegaon Yatra | Agrowon

पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्‍यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा, पांडुरंग नारायण पाटील, माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला.

Malegaon Yatra | Agrowon

माळेगाव यात्रेच्या निमित्ताने ़ शासनाच्या विविध योजना जनसामान्यांना माहिती करण्यासाठी विविध स्टाॅल उभारले जातात

Malegaon Yatra | Agrowon

या स्टाॅल च्या माध्यमातून जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची प्रचार प्रसार केला जातो

Malegaon Yatra | Agrowon
cta image | Agrowon